SBI Solar Panel Scheme : स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. सध्याही बँक आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देत आहे, जसे की ग्राहक कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यवसायिक कर्ज व वैयक्तिक कर्ज. सोलर पॅनल बसवण्यासाठी पण SBI बँकेकडून कर्ज उपलब्ध आहे. ज्यामुळे होणाऱ्या वाढत्या वीज बिलाचा त्रास कमी होईल.SBI Solar Panel Scheme
Solar Panel Installation Subsidy
सरकारने सोलर पॅनल इन्स्टॉलेशनसाठी विविध अनुदान उपलब्ध करून दिली आहेत.PM सूर्य घर मोफत वीज योजनेमार्फत नागरिकांना दरमहा 300 युनिट पर्यंत मोफत वीज मिळते. या योजनेमार्फत 1 KW पासून 10 KW पर्यंतचे सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते.
- 1 किलो वॅट सोलर पॅनलसाठी ₹.30,000
- 2 किलो वॅट सोलर पॅनलसाठी ₹.60,000
- 3 किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंतच्या सोलर पॅनलसाठी ₹.78,000
SBI बँकेच्या कर्जाच्या अटी
SBI च्या अधिकृत संकेतस्थळानुसार तीन किलो वॅटच्या सोलर पॅनल साठी ग्राहकांना दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच तीन किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंतच्या सोलर पॅनल साठी कमल सहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज देण्यात येते.
- होम लोन ग्राहकांसाठी 9.15% व्याजदर
- नॉन होम लोन ग्राहकांसाठी 10.15% व्याजदर
साडेचार लाख रुपये पर्यंतचे कर्ज आणि हफ्ता
जर एखाद्या विना ग्रह कर्ज ग्राहकाला सोलर पॅनल साठी ₹.4,50,000 कर्ज पाच वर्षांच्या कालावधीसाठी 10.15% व्याज दराने मिळाले, तर त्या ग्राहकाला ₹.9,594 इतका मासिक हप्ता भरावा लागेल. तसेच या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये ग्राहकाला एकूण ₹.5,75,640 इतकी रक्कम भरणे आवश्यक आहे, ज्यामध्ये ₹.1,25,640 व्याज म्हणून भरणे अपेक्षित आहे.
सोलर पॅनलचे फायदे
सोलर पॅनल बसवण्याचा मुख्य फायदा म्हणजे विजेच्या बिलांमध्ये घट. हे न केवळ दीर्घकालीन बचत करते, तर पर्यावरणासाठी ही फायदेशीर आहे. त्यामुळे सोलर पॅनल मध्ये गुंतवणूक करणे हा एक शहाणपणात म्हणावा लागेल.
SBI Solar Panel Scheme
SBI ने सोलर पॅनल इन्स्टॉलेशन साठी कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये कॉलर पॅनल बसवण्याची संधी मिळेल. यामुळे वीज बिलाची बचत आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक परिणाम साधता येईल. त्यामुळे या योजनेचा लाभ हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
मित्रांनो वरील माहिती आम्ही विविध स्त्रोतांकडून घेत असतो, त्यामुळे आपण सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.