Career After 12th : मित्रांनो 12 वी नंतर पुढे काय असा प्रश्न तर आपण सर्वांनाच पडतो पण तुम्ही जर योग्य प्रकारे विचार केला आणि मार्गदर्शन घेतले तर तुमच्यासाठी ही बाब सोपी ठरेल. त्यामधील एक म्हणजे मर्चंट नेव्ही हे नाव सर्वांना माहिती असेल, तर याच बद्दलची माहिती आम्ही आपणास या लेखामध्ये देणार आहोत. मर्चंट नेव्ही ही एक व्यावसायिक सेवा आहे जी देशांदरम्यान समुद्रमार्गे माल आणि प्रवाशांची वाहतूक करत असते.
मर्चंट नेव्ही हे एक करिअर क्षेत्र आहे ज्यामध्ये समुद्रमार्गे माल आणि प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. जगामधील 90% व्यापार हा या सेवेवर अवलंबून आहे. आपल्या भारतासारख्या देशात रोज क्रूड ऑइल, धान्य , वाहने आणि दैनंदिन वस्तूंची आयात निर्यात होत असते. हे एक व्यावसायिक क्षेत्र असून ते भारतीय नौदलापासून वेगळे आहे. या मध्ये पगार, पदोन्नती आणि संधी या खाजगी कंपनी अवलंबून असतात.
मर्चंट नेव्ही म्हणजे काय?
मर्चंट नेव्ही ही एक व्यावसायिक सेवा आहे जी देशांदरम्यान समुद्रमार्गे माल आणि प्रवाशांची वाहतूक करत असते. ही सेवा सैनिकी नसून व्यावसायिक आहे. भारतीय नौदल हे देशाच्या संरक्षणासाठी असते तर मर्चंट नेव्ही हे व्यवसाय साठी आहे. यामध्ये जहाजांमध्ये बसून जगभर फिरण्याची संधी मिळते आणि करिअर मध्ये वेगाने वाढ होते.
भारतीय नौदल आणि मर्चंट नेव्ही मधील फरक
मर्चंट नेव्ही हे व्यावसायिक क्षेत्र आहे जिथे पगार पदोन्नती आणि संधी या खाजगी कंपनी अवलंबून असतात. भारतीय नौदल हे सरकारी आहे जे संरक्षणाशी संबंधित आहे. मर्चंट नेव्ही मध्ये जहाचे ही मालवाहतुकीसाठी असतात तर भारतीय नौदल हे युद्ध आणि संरक्षणासाठी कार्यरत असते. दोन्ही क्षेत्रे समुद्राशी संबंधित असले तरी कार्य मात्र वेगवेगळे आहे.
मर्चंट नेव्ही मध्ये नोकरी कशी मिळवायची?
तुम्ही 10वी किंवा 12वी नंतर डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग (डीजीएस) मंजूर संस्थांमधून कोर्स करू शकता. तुम्हाला जर डेक, इंजिन किंवा जीपी या मध्ये आवड असेल तर निवडा. डिग्री कोर्ससाठी इंडियन मॅरिटाइम युनिव्हर्सिटीची प्रवेश परीक्षा द्या. तुमचा कोर्स पूर्ण झाला की वैद्यकीय तपासणी आणि कंटिन्यूअस डिस्चार्ज सर्टिफिकेट (सीडीसी) मिळवा आणि त्यानंतर शिपिंग कंपन्यांमध्ये अर्ज करा किंवा कॅम्पस प्लेसमेंटद्वारे ट्रेनी किंवा कॅडेट म्हणून सुरुवात करा.
Career After 12th
बारावी नंतर विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जीपी रेटिंग कोर्स करून लवकर नोकरी मिळवता येते. डेक विभागामध्ये जहाज हाताळणी आणि नेव्हिगेशनसाठी डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स (1 वर्ष) किंवा BSC इन नॉटिकल सायन्स (3 वर्षे ) करा. इंजिन विभागांमध्ये मशिनरी आणि तांत्रिक कामासाठी बीटेक इन मरीन इंजीनियरिंग (4 वर्षे) किंवा Graduate मरीन इंजीनियरिंग (GME 1 वर्ष) हा कोर्स निवडा.
जीपी रेटिंग कोर्स काय आहे?
जीपी रेटिंग कोर्स प्रवेश स्तराचा कोर्स आहे जो 10वी किंवा 12वी नंतर 6 महिने चालतो. तो झाल्यानंतर चहाच्या इंजिन किंवा डेक विभागामध्ये सहाय्यक म्हणून काम करता येते. हा कोर्स लवकर नोकरी मिळवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. कमी वेळेमध्ये करिअर सुरू करण्यास मदत होते.
डेक विभाग
तुम्हाला जर जहाज हाताळणी आणि नेव्हिगेशनमध्ये आवड असल्यास हा विभाग निवडू शकता. तुम्ही डेक कॅडेड म्हणून सुरुवात करा, अनुभव आणि परीक्षेनंतर थर्ड ऑफिसर, सेकंड ऑफिसर किंवा कॅप्टन पर्यंत पोहोचता येते. यासाठी 12वी नंतर डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स आवश्यक आहेत.
इंजिन विभाग
मला जर मशीन, इंजिन किंवा तांत्रिक कामात आवड असल्यास मरीन इंजिनिअरिंग निवडा. ज्युनिअर इंजिनिअर म्हणून सुरुवात करा आणि अनुभवाने चीफ इंजिनिअर पर्यंत पोहोचा. इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आवड असल्यास इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर (ईटीओ) कोर्स करून जहाजावरील इलेक्ट्रॉनिक सिस्टम हाताळता येते.
करियर आणि पगार वाढ
सुरुवातीस मर्चंट नेव्ही मध्ये पगार आकर्षक आहेत.सुरुवातीस डेक कॅडेट, जीपी रेटिंग किंवा ज्युनियर इंजिनिअरला 30 हजार ते 60 हजार रुपये मासिक वेतन मिळते. अनुभव आल्यास ऑफिसर पदावरती 1 लाख ते 3 लाख रुपये पर्यंत पोहोचता येते.कॅप्टन किंवा चीफ इंजिनियरला 8 लाख ते 15 लाख किंवा त्याहून अधिक मिळू शकतात. पगार जहाज प्रकार, अनुभव आणि कंपनीवर अवलंबून असतो.
मित्रांनो आम्ही अशी आशा करतो की Career After 12th ही माहिती आपणास नक्कीच आवडली असेल. तुमच्याही जवळच आणि गरजू मित्रांना ही माहिती जरूर शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळण्यास थोडीशी मदत होईल.